PAK vs AUS :विश्वचषकाच्या 18 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला आहे. एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत नऊ गडी गमावून 367 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला केवळ 305 धावा करता आल्या आणि सामना गमावला.
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला आहे. यासह कांगारू संघाने स्पर्धेतील दुसरा विजय संपादन केला आहे. या विश्वचषकात पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी भारताविरुद्धही पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता ऑस्ट्रेलियन संघ गुणतालिकेत अव्वल चार संघांमध्ये सामील झाला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत डेव्हिड वॉर्नरच्या 163 धावा आणि मिचेल मार्शच्या 121 धावांच्या जोरावर 367 धावांची मोठी धावसंख्या उभारली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने पाच आणि हरिस रौफने तीन विकेट घेत ऑस्ट्रेलियाला400 धावांपर्यंत मजल मारण्यापासून रोखले. त्याचवेळी इमाम उल हकने 70 आणि अब्दुल्ला शफीकने 64 धावा करत पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली, मात्र यानंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. ऑस्ट्रेलियातर्फे अॅडम झाम्पाने चार, पॅट कमिन्स आणि मार्कस स्टॉइनिसने प्रत्येकी दोन गडी बाद केले. पाकिस्तानचा संघ 45.3 षटकात 205 धावांवर सर्वबाद झाला आणि 62 धावांनी सामना गमावला.