Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अ‍ॅडम ‍गिलख्रिस्ट

अ‍ॅडम ‍गिलख्रिस्ट

सॉ. अर्चना गजेंद्र भटूरकर

नाव : अ‍ॅडम क्रेग ‍गिलख्रिस्ट
जन्म : १४ नोव्हेंबर १९७१
ठिकाण : बेलिंगहॅम, न्यू साऊथ वेल्स
देश : ऑस्ट्रेलिया
कसोटी पदार्पण : ऑस्ट्रलिया वि पाकिस्तान, ब्रिस्बेन १९९९
वन डे पदार्पण : ऑस्ट्रलिया वि द. आफ्रिका, फैसलाबाद १९९६
शै‍ली : डावखुरा फलंदाज व यष्टिरक्षक

क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हणून अ‍ॅडम ‍गिलख्रिस्ट ओळखला जातो. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यात स्फोटक सलामीवर म्हणूनही तो प्रख्यात आहे. नुकत्याच झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत त्याचा प्रत्यय आला.

संथ खेळणे त्याला कधीच जमले नाही. हातात बॅट असली की तो गोलंदाजांचा कर्दनकाळ असतो. पदार्पणानंतर दुसर्‍याच कसोटीत त्याने दीडशतकी मजल मारत ऑस्ट्रेलियास सहज विजय मिळवून दिला होता. सध्या तो ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार आहे. अतिशय प्रामाणिक खेळाडू म्हणूनही तो ओळखला जातो. बाद झाला असेल तर तो पंचांच्या निर्णयाचीही वाट न पाहता निघून जातो.

ऑस्ट्रेलियाला ‍विश्वविजेते बनविण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. २००७ च्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्याने १४९ धावांची तडाखेबाज फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला.

पुरस्कार
१. विस्डेनचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू २००२
२. सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू -२००३
३. अ‍ॅलन बॉर्डर पदक - २००३
४. सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू -२००४

कसोटी
सामने - ८९
धावा - ५३५३
सरासरी - ४८.६६
सर्वोत्तम - २०४ (नाबाद)
१०० - १७
५० - २४
झेल - ३४४
यष्टिचित - ३७

वन ड
सामने - २६८
धावा - ९०३८
सरासरी - ३६.००
सर्वोत्तम - १७२
१०० - १५
५० - ५०
झेल - ३८८
यष्टिचित - ५१

अद्ययावत : 30 एप्रिल 2007 पर्यंत.

Share this Story:

Follow Webdunia marathi