कालगणनेचा विचार केला तर ह्या जगतात चार युग येतात व जातात. 1) सत्ययुग 2) त्रेतायुग 3) द्वापरयुग 4) कलियुग. श्रीसमर्थांनी कलयुगाचे वर्णन केले आहे. अजूनही हे कलीयुग सुरूच आहे. सामाजिक, राष्ट्रीय व धार्मिक समाजस्थिती समर्थकालीन होती त्यापेक्षा फारशी बदललेली आजही दिसत नाही. समर्थानी अभंगात म्हटले आहे 'न्याय बुडाला अवघा अन्याय जाला'। दासबोधात ते म्हणतात 'कोणी पुसेना कोणाला'। कारण 'मतामतांचा गलबला। जो जे मति सापडला। तोचि थोर।' समर्थांच्या वेळेस परकीय सत्ता होती आज आपण आपले राजे. तरीही परिस्थितीत सुधारणा नाही. हा कलियुगाचाच महिमा म्हणावा लागेल. माणसाच्या विकासाकरता, सुख सोईकरता लागणारे गुणल लागणारी विद्या कुठे लोपली हे कळतच नाही.
खरा आणि खोटा। अवघा जाला गळाठा। ह्या कलियुगाने सार्या सत्याच्यावाटाच मोडून टाकल्या आहेत. आज रोजच्या जीवनात काय दिसते? आई-वडिलांपासून गुरूजनापर्यंत कोणालाही योग्य न्याय मिळत नाही. मान मिळत नाही. आई-वडिलांनी आपआपली कर्तव्ये मुकाट्याने बजावावी. मुलांना कर्तव्यच नसते . त्यांचा आई-वडिलांच्या पैशावर हक्क मात्र असतो. समाजात आई-वडिलांचे व त्यांच्या मुलांचे संबंध पाहिले की मन दुखावते. कनक, कांता आणि जिव्हा ह्या तीन वासना माणसाचा नाश करतात असे शास्त्र सांगते. पण आज शास्त्र कुठे दडी मारून बसले आहे? 'हम करे सो कायदा' ही वृत्ती समर्थकाली होती. आजही त्या परीस्थितीत बदल झालेला दिसन नाही.
हजारो वर्षे भारत परकीय सत्तेखालीच राहिला. त्यामुळे समाजाला त्या स्थितिची सवय होऊन गेली म्हणूनच आपल्या जीवनपद्धतीचे नुकसान झाले. काही प्रमाणात जेतेपणा जाऊन जेतापणा आला होता म्हणूनच 'उदंड जाहले पाणी। स्थान संध्या करावया।' असे समर्थ म्हणून गेलेत. स्नानसंध्या हे भारतीय जीवनपद्धतीचे बहिरंग. त्यातच धर्म-अर्थ-न्याय-नीती व अध्यात्माचा समावेश आहे. कारण त्यात आमच्या जीवनाचा विकास साधता येतो असे भारतीय संस्कृती सांगते. सध्या ा'न्यार निती बहुतेक बुडाली।' शाहाण्या लोकांना नष्टच्या पुढे पडते घ्यावे लागते. सारासार विचारच नाही. वासनापूर्तीच्या मागे सारा समाज लागला आहे. मतामतांचा बुजबुजाट झाला आहे. 'नाना मते निर्माण झाली। नाना पाषांडे वाढली।' त्यामुळे विचारांचा गलबला झाला आहे. समर्थ म्हणतात 'ऐसा नासला विचार। कोण पाहातो सारासार। युक्त आयुक्त पाहातो कोण? समर्थकाली मुसलमानी सत्ता होती हिंदूचा छळ होत होता. अन्न अन्न दशा भोगावी लागत होती. आजही स्वार्थ बोकाळला आहे. पैशाला पहिला नंबर मिळाला. त्यामुळे शिरजोरी वाढली आहे. हीच अवस्था समर्थकालीन होती. 'पैक्या कारणे कारणे । होती मारीमारी। तोच परिणाम आजही दिसतो प्राणीमात्र झाले दु:खी। पाहाता कोणी नाही सुखी। अशा अवस्थेत भले माणूस पिचून जातात. त्यांना नष्टांची भीतीच वाटते. तरी मग ते शहाणे नष्टांचे अनुकरण करतात व सर्व जीवन विस्कळीत करतात. हा समर्थांच्या अभंगातील व दासबोधातील विचारांचा पगडा नव्हे, समर्थांची प्रचितीच आज आपल्याला येत आहे, असे म्हटले तर चूक होणार नाही.
जय जय रघुवीर समर्थ।