दत्त संप्रदायाला भक्तांच्या हृदयात विशेष स्थान आहे आणि त्याच्याशी संबंधित दैवी अवतार अत्यंत भक्तीने पूजनीय आहेत. या आदरणीय आध्यात्मिक अवतारांचे आवडते पदार्थ अर्पण करणे ही एक पवित्र परंपरा मानली जाते. आज आम्ही महाराष्ट्रातील काही महान गुरुंचे आवडते पदार्थ सांगत आहोत. ज्यांचा नैवेद्य दाखवून आपण प्रसाद ग्रहण करुन धन्य होऊ शकता.
भगवान श्री दत्तात्रेय : श्री दत्तात्रेय महाराजांना केसरी गोड भात, केसरी दूध, घेवड्याची भाजी, शिरा, केसरी पेडा आणि सुंठवडा याचा नैवेद्य दाखवला जातो.