GuruCharitra Parayan Sankalp गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करणे आवश्यक आहे. या प्रकारे तयारी करा-
साहित्य - एक चौरंग, एक पाट किंवा आसन, गुरुचरित्र पोथी, अक्षता, फुले, फुलांचा हार, तुळशीची पाने, २ सुपारी, २ विडयाची पाने, तूप, पंचामृतपाच फळं, अबीर, गुलाल, बुक्का, उदबत्ती, दिवा, कापूस, आरतीचे ताट, कापूरारती, धूपाटणे, चंदन, तांब्याची पळी, पंचपात्र, एक तांब्याचं ताम्हण आणि एक पितळेचे ताम्हण, पाणी, हात पुसण्यासाठी कापड. २ नाणी, २ अखंड दीप (एक देशी तुपाचा आणि दुसरा तेलाचा).
सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी घरातील देवांना व वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करावा. त्यांच्या आर्शीवाद घेऊन परायणाला सुरुवात करावी. सात दिवस पोथीकडे अखंड दिवा तेवत असावा. वाचन चालू असताना तुपाचा दिवा ठेवावा.
गुरुचरित्र पारायण संकल्प विधी
आचमन सुरु करताना पळी पंत्रपात्री डाव्या हाताला आणि ताम्हण उजव्या हाताला ठेवून आचमन सुरु करावे.
आचमन
डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हातावर घेऊन तीन वेळा आचमन करा
ॐ केशवाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ नारायणाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ माधवाय नमः (असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे)
ॐ गोविन्दाय नमः (हातातले पाणी ताम्हणात सोडावे.)
पुढील नावे नमस्कार करुन क्रमाने म्हणावी-
हात जोडून पुढचे मंत्र म्हणा-
ॐ विष्णवे नमः। ॐ मधुसूदनाय नमः। ॐ त्रिविक्रमाय नमः। ॐ वामनाय नमः।
ॐ श्रीधाराय नमः। ॐ हृषीकेशाय नमः। ॐ पद्मनाभाय नमः। ॐ दामोदराय नमः।
ॐ संकर्षणाय नमः। ॐ वासुदेवाय नमः। ॐ प्रद्युम्नाय नमः। ॐ आनिरुद्धाय नमः।
ॐ पुरुषोत्तमाय नमः। ॐ अधोक्षजाय नमः। ॐ नारसिंहाय नमः। ॐ अच्युताय नमः।
ॐ जनार्दनाय नमः। ॐ उपेन्द्राय नमः। ॐ हरये नमः। ॐ श्रीकृष्णाय नमः।
पुनः आचमन
वरील क्रिया पुन्हा करावी.
प्राणायाम
खालील मंत्र म्हणताना अनुलोम-विलोम प्राणायाम करा.
ॐ प्रणावस्य परब्रह्म ऋषिः। परमात्मा देवता। दैवी गायत्री छंद:। प्राणायामे विनियोगः। ॐ भू: ॐ भुवः ॐ स्वः ॐ मह: ॐ जन: ॐ तपः ॐ सत्यम् ॐ तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धियो योन: प्रचोदयात् । ॐ आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुव स्वरोम ।
देवता वंदन आणि ध्यान
उजव्या हातात पाणी, फुल, अक्षता घ्या आणि लक्ष्मी, गणेश इत्यादी देवांची पूजा करण्याचा संकल्प करा -
ॐ श्रीमन्महागणपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री वेदाय नमः। वेदपुरुषाय नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। स्थान देवताभ्यो नमः। वास्तु देवताभ्यो नमः। श्रीपाद्श्रीवल्लभाय नमः । श्रीसद्गुरुनृसिंहसरस्वत्यै नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। सर्वेभ्यो ब्रह्मणेभ्यो नमः। मातापितृभ्यां नमः। श्रीगुरुभ्यो नमः।। अविघ्नमस्तु ।।
सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णकः । लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ।
धूम्रकेतुर्गणाध्यक्शो भालचंद्रो गजाननः । द्वादशैत्तनि नामानि यः पठेच्छृणुयादपि ॥
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥
शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं । प्रसन्नवदनं ध्यायेत्सर्वविघ्नोपशान्तये ।
सर्वमङ्लमाङ्गल्ये शिव सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते ।
सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषांमङ्गलम् । येषां ह्रदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः ॥
तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि ॥
लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः । येषामिन्दीवरश्यामो ह्रदयस्थोजनार्दनः ॥
विनायकं गुरुं भानुं ब्रह्माविष्णुमहेश्वरान् । सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ॥
अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ॥
सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः । देवा दिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ॥
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मनो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जंबुद्विपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिण तीरे
शालिवाहन शके (मराठी वर्ष संख्या)
(मराठी वर्षाचे नाव) नाम संवत्सरे,
(जे आयन सुरू असेल ते) दक्षिणायने \ उत्तरायने,
(सुरू असलेला ऋतु) ऋतौ,
(मराठी महिना) मासे,
(पक्ष) कृष्ण पक्षे \ शुक्ल पक्षे,
(तिथी) तिथौ,
(वार) वासरे,
(त्या वेळेच नक्षत्र) नक्षत्रे,
(योग) योगे,
(करण) करणे,
(चंद्र ज्या राशीत असेल ती राशी) स्थिते चन्द्रे,
(सूर्य ज्या राशीत असेल ती राशी) स्थिते सूर्ये,
(गुरु ज्या राशीत असेल ती राशी) स्थिते देवगुरौ,
शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ
मम (आपले नाव आणि गोत्राचा उच्चार करून) आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपदचतुष्पदसहितानां क्षेमस्थैर्यायुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थं समस्ताभ्युदयार्थं च श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-दत्तात्रेयदेवताप्रीत्यर्थं सर्वारिष्ट शांतिपूर्वक- सकलमंगलावाप्त्यर्थं श्रीगुरुचरित्रसप्ताहपारायणं करिष्ये । तदंगत्वेन पुस्तकरूपी श्रीगुरुदत्तात्रेयपूजनं च करिष्ये । तथा आसनादिकलशशंखघंटादीप- पूजनं च करिष्ये (नंतर उजव्या हाताने उदक सोडून पारायणास प्रारंभ करावा.)
वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं उरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा । श्रीमहागणपतये नमः ।
अथ ग्रन्थपूजा । पुस्तकरूपिण्यै सरस्वत्यै नमः गन्धपुष्पतुलसीदलहरिद्राकुंकुमाक्षतान् समर्पयामि ।
धूप दीप नैवेद्यं समर्पयामि ।
(असे म्हणून आसन, कलशपूजा, तसेच शंख-घंटा-दीप यांची पूजा करून गुरुचरित्र पोथीची पूजा करून वाचण्यास सुरुवात करावी)
सात दिवस पोथीकडे अखंड दीप ठेवावा. वाचन सुरु असेल तेव्हा तुपाचा दीवा लावावा.
वरील संकल्प करणे कठीण वाटत असल्यास सोपा संकल्प करावा -
संकल्प घेण्यापूर्वी घरातील देव व वडीलधार्यांचे पाया पडून कार्यांस अनुज्ञा घेऊन बसावे.
संकल्प :
एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ ममः आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं मम मनेप्सित कार्यसिद्ध्यर्थं श्रीपादश्रीवल्लभ -नरसिंहसरस्वती -दत्तात्रेयदेवता -प्रीत्यर्थं श्रीगुरुचरित्रसप्ताहपारायणं करिष्ये ।
(असे म्हणून पाणी सोडून आसन, कलशपूजा, तसेच शंख-घंटा-दीप यांची पूजा करून गुरुचरित्र पोथीची पूजा करून वाचण्यास सुरुवात करावी)
सार्वजनिक कल्याणाकरितां अर्थात राष्ट्रहिताकरितां करणेचा संकल्प
संकल्प :
एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ अस्मिन् भारतवर्षीय जनानां क्षेमस्थैर्य-ऐश्वर्याभिवत्यर्थ धर्म-भिवत्यर्थ-स्वातंत्र्यप्राप्त्यर्थ, स्वातंत्र्यमध्येषु सकलशत्रुविनाशनार्थ, तत् शत्रुसंहारक-तेजोबलवीर्यप्राप्त्यर्थं, सकलभयनिरसनार्थ, अभयसिदार्थ श्रीदत्तात्रेयदेवताप्रीत्यर्थं श्रीगुरुचरित्रसप्ताहपारायणाख्यं कर्म करिष्ये.
(असे म्हणून पाणी सोडून आसन, कलशपूजा, तसेच शंख-घंटा-दीप यांची पूजा करून गुरुचरित्र पोथीची पूजा करून वाचण्यास सुरुवात करावी)