Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय १३

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय १३
बाळवर्य ज्ञानज्योति । कृष्णमाधवसरस्वती । सदानंदोपेंद्रयती । सातवा मी हे मुख्य शिष्य ॥१॥
अधूर्त सर्व शांत । गुरु ऐशां शिष्यांसहित । आले जन्मभूमीप्रत । हो माताही यतिवंद्या ॥२॥
विनन्ति करुनी नर । विश्वरुपा घरोघर । न्हेती देती गुरुवर । परपार मायबापां ॥३॥
तो प्रभू म्हणे भगिनीला । दंपतीभेद केला । त्वां लातिलें हो धेनूला । पती त्यजील कुष्ठी होसी ।
ते भूयः प्रार्थितां म्हणती । वृद्धत्वीं पति हो यति । कुष्ठाची करीन शांति । स्त्रियां पति गती न अन्य ।
असें तये वेळीं तिला । सांगोन शिष्यमेळा । घेवोनि ये गोदावरीला । भूगोला उद्धरी जो ॥६॥
शिष्य मेळवी आणिक । माधवारण्यसंज्ञक । ज्ञान देउनी सम्यक् । विशोक केला गुरुनें ॥७॥
गुरुवर्य पुढें येती । तेथ एका विप्रा पाहती । मराया ये गोदेप्रति । दगड पोटीं बांधोनिया ॥८॥
तयाचा तो जाणून भाव । शिष्यां म्हणती घ्यारे धांवा शिष्यें घेवोनिया धांव । तयास जवळ आणिला ।
तो साद्यंत पुसतां वदे । शूलपीडित मी प्राण दें । कुकर्मं केले पूर्वीं मदें । त्याचें फल दे देव हें की ।
नाहीं पुण्य पूर्वापार । मी झालों भूमीभार । गुरु म्हणती अनिवार । दोष फार आत्मघातें ॥११॥
तूं मरु नको रोगावर । औषध देतों मी शीघ्र । ऐसें म्हणती गुरुवर । तवं ये विप्र सायंदेव ॥१२॥
तो तोषवी श्रीरुसी । म्हणे द्विजमी कांचीवासी । गुरु म्हणती हा उपवासी । या द्विजासी जेवूं घालीं ।
हें साम्प्रत करी काज । सायंदेव म्हणे हा द्विज । अन्नवैरी झाला आज । दोष ये मज हा मरतां ॥१४॥
अपूप दे म्हणती तया । तें मानून गुरुराया । भिक्षेला ने प्रार्थुनियां । द्विज शिष्यांसमवेत ॥१५॥
धू पाद्ये गुरुचे पाद । पूजी विधीनें वंदी पाद । जेववी सर्वां हो सानंद । झाला विगद तोही विप्र ।
इति श्री०प०प०वा०स०वि०गु० सारे विप्रशूलहरणं नाम त्रयोदशो०
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय १२