Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय २८

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय २८
जो दूरी त्यजी धर्मास । मायाबापदेवगुरुस । निर्दोष स्त्रीपुत्रास । चोर असत्यवादी जो ॥१॥
जो निरंतर अशुद्ध । हरिहरां करी भेद । हो पाखंड दुर्वाद । पंक्तिभेद करी खळ ॥२॥
मारी यत्‍नें जीवा क्रूर । जाळी वनग्रामघर । विकी कन्या गोरस मंत्र । फिरवी विप्रअतिथीतें ॥३॥
जो निंदक श्राद्धातें । न करी फोडी कूपांतें । तोडी मार्गाश्रयवृक्षातें । जेवी व्रतातें सोडून ॥४॥
जो दिवापर्वणीं स्त्रीशीं । भोगी रमे परस्त्रीसी । करी विश्वासघातासी । दत्तदानासी घे पुनः ॥५॥
जो स्वप्नोपमसुखार्थ । मारणादि करी व्यर्थ । परतापी करी अनर्थ । नाडी नेणत दे औषध ॥६॥
तो पतित होयी मांग । जो करी वृषलीसंग । करी स्नानसंध्यांत्याग । पंचयाग टाकून जेवी ॥७॥
जो होय वृत्तिरत्‍नहर्ता । दुष्प्रतिग्रही दुर्भोक्ता । मद्य पीतां ये हीनता । अनुतप्ता दोष थोडा ॥८॥
जो लुच्चा जिती विप्रात । हूं तूं करी पितृगुरुंस । तो होयी ब्रह्मराक्षस । हो वायस निर्मंत्राशी ॥९॥
तो कप्युदरीं जन्म घे । चोरुनि जो फळपत्र घे । जो धन चोरुनि घे । जन्म घे तो उंटाचें ॥१०॥
हो उत्क्रान्तीनंतर । नरकवास घोर । ह्या योनी त्या नंतर । दंभकर बगळा हो ॥११॥
माशी मधुहर उंदीर । धान्यहर जळहर । चातक पशु तृणहर । स्वर्णहर कृमिकीट ॥१२॥
दुर्गती आधीं भोगून । होतां पुण्यपाप समान । अंधपंग्वाद्यघचिन्ह । ये घेऊन येथें पुन्हां ॥१३॥
कृमीश्व खर जारकर्मे । स्त्री नरां गती हे दुष्कर्में । जे वागती सत्कर्मे । स्वधर्में तरती ते ॥१४॥
हो परःस्पर दंपती । दोषी ऐसें गुरु बोलती । पुसे त्रिविक्रम निष्कृती । सांगती गुरु तया ॥१५॥
तरी गृहीत ब्रह्मदंड । शरण विप्रां पापखंड । हो होता पाप उदंड । कृच्छ्रमुंडपूर्वक कीजे ॥१६॥
शक्तिहीनें गोधन द्यांवे । जप यात्रा होम करावे । शक्तें चांद्रायण करावें । गव्य प्यावें अनुतापें ॥१७॥
स्वात्मत्वैश्वर्ययुक्त । गुरु वारी सर्व दुरित । पितृत्यागें हो पतित । होई पूत मासस्नानें ॥१८॥
पतितानें ते ऐकून । म्हटलें मी झालो पावन । घ्या विप्रांत मेळवून । ते ऐकून गुरु म्हणे ॥१९॥
होऊनि नृप विश्वामित्र । सायासें झाला पवित्र । तूं हीन वेदापात्र । ये परत्र विप्रकुळीं ॥२०॥
तो आसंन येतां स्त्रीला । स्पर्शभयें मारुं आला । गुरु म्हणे त्यजीन स्त्रीला । तो म्हणाला हीन होउं कीं ॥
तेतया अंगींची विभूती । लुब्धा हातीं धुवविती । ज्ञान जाउनी त्या ये भ्रांति । घरा प्रति गेला सस्त्रीका ॥
प्रणति करी त्रिविक्रम । म्हणे वारा माझा भ्रम । अंग धूता ज्ञान उत्तम । जाउनी भ्रम त्या हो केंवी ॥२३॥
इति श्री०प०प०वा०स० सारे कर्मविपाककथनं नामअष्टाविंशो०

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय २७