Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय ५

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय ५
ये श्राद्धा ही विप्राघरीं । उत्तरदेशीं भिक्षा करी । श्राद्धापूर्वीं द्विजनारी । दान करी श्राद्धान्नाचें ॥१॥
दत्त विप्रस्त्रीचा भाव । पाहुनी सुत स्वयमेव । झाला श्रीपादराव । गृहभाव स्वीकारीना ॥२॥
विशेष विद्याभिन्न झाला । तात आरंभी विवाहाला । पुत्र म्हणे योगश्रीला । वरीं, अबला सर्व माता ॥३॥
निश्चय हा ते ऐकून । खिन्न होती त्यां दावून । त्रिमूर्तीरुप, आश्वासून । बंधू दोन पंग्वंध जे ॥४॥
करी प्रभू त्यांवरी डोळा । चालूं लागला पांगळा । पाहूं लागला आंधळा । अतर्क्य लीला श्रीपादाची ॥५॥
आशीर्वाद देई तयां । काशीपुरा जाऊनिया । बर्दयाश्रम पाहुनिया । श्रीपाद ये गोकर्णासी ॥६॥
विमलाः कीर्तयो यस्य । श्रीदत्तात्रेय एव सः कलौ श्रीपादरुपेण । जयति स्वेष्टकामधुक् ॥७॥
इति श्री०प०प०वा०स० सार श्रीपादावतारकथनं नाम पंचमो०

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय ४