Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री दत्त माला मंत्र लाभ आणि नियम

webdunia
बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (15:22 IST)
श्री दत्त माला मंत्र हा एक अत्यंत चमत्कारी मंत्र आहे. श्री दत्तात्रेयोपनिषदातील दत्तमाला मंत्र एक पूर्ण मंत्र आहे. सर्व अडचणी दूर करण्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, तणाव व नकारात्मकता यांचा प्रभाव कमी होण्यासाठी "श्रीदत्तमाला मंत्र" अतिशय प्रभावी ठरतो.
 
श्री दत्त माला मंत्र जपण्याचे नियम
स्नानोपरांत शुचिर्भुतपणे पूर्वाभिमुख बसुन "श्रीदत्तमाला मंत्र" हा सर्वप्रथम एखाद्या शुभ वार किंवा गुरुवार या दिवशी सलग 108 पाठ करुन सिध्द करावा लागतो. 
हे संपूर्ण स्तोत्र म्हणजेच एक मंत्र असुन याची 108 वेळा आवर्तने करावयाची असते.
उच्चार नीट करावा.
हे वाचन सुरु असताना मध्येच उठणे- बोलणे टाळावे. वाचन एकसलग करावे. 
प्रथम 108 पाठ पूर्ण झाल्यावर स्तोत्र सिध्द होईल. नंतर दररोज किमान एक ते कमाल 21 असे कितीही पाठ करता येतात.
श्रीदत्तमाला मंत्र जपल्याने आर्थिक समस्या दूर होतात.
अनारोग्य यांच्या निवारणासाठी देखील हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे.
अत्यंत प्रभावी मंत्र श्री दत्तमाला मंत्र सिद्धी साठी सुरवातीस व अखेरीस 108 वेळा ॐ द्राम दत्तात्रेयाय  नमः हा जप  करावा. 
 
श्रीदत्तमाला मंत्र सिध्द झाल्यानंतर काही बंधने आयुष्यभर कटाक्षाने पाळावी लागतात. त्याबद्दल जाणून घ्या- 
वर्षभरातील प्रत्येक गुरुवार, प्रत्येक पौर्णिमा, दत्तजयंती, गुरुपौर्णिमा, चैत्र व अश्विन नवरात्रातील नऊ दिवस कोणत्याही स्वरुपात मांसाहार तसेच मद्यपान करणे वर्ज्य करावं लागतं.
शक्य असल्यास प्रत्येक गुरुवारी दत्ताचे दर्शन किंवा गुरुंचे दर्शन घ्यावे.
शक्य जितकं आणि शक्य तेव्हा गरिबांना आणि पशु- पक्ष्यांना अन्नदान करावे. 
वर्षातून कधीही गरिबांना वस्त्रदान करावे.  
 
॥ श्रीदत्तमाला मन्त्र ॥
।। ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय, स्मरणमात्रसन्तुष्टाय,
महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय, चिदानन्दात्मने
बालोन्मत्तपिशाचवेषाय, महायोगिने अवधूताय,
अनसूयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय, ॐ भवबन्धविमोचनाय,
आं असाध्यसाधनाय, ह्रीं सर्वविभूतिदाय,
क्रौं असाध्याकर्षणाय, ऐं वाक्प्रदाय, क्लीं जगत्रयवशीकरणाय,
सौः सर्वमनःक्षोभणाय, श्रीं महासम्पत्प्रदाय,
ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय, द्रां चिरंजीविने,
वषट्वशीकुरु वशीकुरु, वौषट् आकर्षय आकर्षय,
हुं विद्वेषय विद्वेषय, फट् उच्चाटय उच्चाटय,
ठः ठः स्तम्भय स्तम्भय, खें खें मारय मारय,
नमः सम्पन्नय सम्पन्नय, स्वाहा पोषय पोषय,
परमन्त्रपरयन्त्रपरतन्त्राणि छिन्धि छिन्धि,
ग्रहान्निवारय निवारय, व्याधीन् विनाशय विनाशय,
दुःखं हर हर, दारिद्र्यं विद्रावय विद्रावय,
देहं पोषय पोषय, चित्तं तोषय तोषय,
सर्वमन्त्रस्वरूपाय, सर्वयन्त्रस्वरूपाय,
सर्वतन्त्रस्वरूपाय, सर्वपल्लवस्वरूपाय,
ॐ नमो महासिद्धाय स्वाहा ।।

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री दत्त भावसुधारस स्तोत्र Shri Datta Bhavsudharasa Stotra