Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

12 वर्षांनंतर सिंहस्थाचा पुष्य नक्षत्र 3 नोव्हेंबर, खरेदीसाठी शुभ मुहूर्त

12 वर्षांनंतर सिंहस्थाचा पुष्य नक्षत्र 3 नोव्हेंबर, खरेदीसाठी शुभ मुहूर्त
या वर्षी धनतेरसच्या आधी येणार्‍या पुष्य नक्षत्राला खास मानण्यात येत आहे कारण 12 वर्षांनंतर सिंहस्थ गुरुच्या संयोगाने भौम पुष्य नक्षत्राचा संयोग बनत आहे. याच दिवशी साध्य आणि शुभ योग देखील आहे. जेव्हा गुरु सिंह राशीत अर्थात सिंहस्थ होतो तेव्हा सूर्य बलवान होतो. सिंहस्थ गुरुच्या संयोगात पुष्य नक्षत्रात खरेदी करणे लाभदायी व अक्षय कारक आहे, यामुळे परिवारात समृद्धी वाढते.  
 
27 नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानण्यात येणारा पुष्य नक्षत्र 2 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजून 24 मिनिटापासून 3 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 5 वाजून 52 मिनिटापर्यंत राहणार आहे. सोमवार (चंद्रमा)पासून सुरू होऊन मंगळवारी दिवसभर अर्थात भौम पुष्य नक्षत्रांचा संयोग झाल्याने धातूंची खरेदी करणे शुभ मानले आहे. सुख-शांती व सौभाग्याचे प्रतीक मानले जाणारे धातू सोनं, चांदी, देवी-देवत्यांच्या तांब्याच्या मुरत्यांची खरेदी केल्याने जीवनात समृद्धीचा वास वाढेल.  
 
राशीप्रमाणे धातूंची खरेदी करा  
 
पुष्य नक्षत्र सर्व राशीच्या लोकांसाठी सुख-समृद्धी घेऊन येणार आहे. कुठल्याही राशीचा व्यक्ती आपल्या सुविधेनुसार सर्व प्रकारच्या धातूंची खरेदी करू शकतात. पण एखाद्याल्या आर्थिक अडचण असेल त्यांनी अंश मात्रेत सोने, चांदीची खरेदी केल्याने येणारा काळ त्याच्यासाठी शुभकारी ठरेल. 
 
तसेच मीन, तूळ, कुंभ, मिथुन, वृषभ राशीच्या लोकांनी स्वर्ण धातू व कर्क, सिंह, वृश्चिक राशीच्या लोकांनी रजत अर्थात चांदीचे दागिने, नाणे आणि कन्या, मकर, धनू, मेष राशीच्या लोकांनी फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स सामान, किचन सामग्री व तांब्याच्या देवी देवतांच्या मुरत्यांची खरेदी केली पाहिजे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi