Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Narak Chaturdashi 14 दिवे का आणि कुठे लावले जातात, जाणून घ्या काय फायदा होईल

deep dan
सोमवार, 24 ऑक्टोबर 2022 (06:53 IST)
दिवाळीत धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी हा दिवस साजरा केला जातो. आश्विन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी ला नरक चतुर्दशी म्हणतात. हा दिवस अनेक ठिकाणी छोटी दिवाळी, रूप चौदस किंवा काली चौदस म्हणून देखील साजरा केला जातो. कृष्‍ण चतुर्दशीला मासिक शिवरात्री देखील म्हणतात. तर जाणून घ्या या दिवशी 14 दिवे का आणि कुठे लावावे? 
 
1. या दिवशी श्रीकृष्णाने भौमासुर म्हणजेच नरकासुराचा वध करून सुमारे 16 हजार स्त्रियांना त्याच्या बंदिवासातून मुक्त केले. या आनंदापोटी दीपप्रज्वलन करून सण 
साजरा केला जातो.
2. या दिवशी यमाची पूजा केल्यानंतर त्याच्यासाठी संध्याकाळी उंबरठ्यावर दिवे लावले जातात, ज्यामुळे अकाली मृत्यूची भीती राहत नाही.
3. या दिवशी सूर्यास्तानंतर लोक आपल्या घराच्या दारावर 14 दिये लावतात आणि दक्षिण दिशेला तोंड करून प्रार्थना करतात.
4. या दिवशी 14 दिवे प्रज्वलित केल्याने सर्व प्रकारच्या बंधनातून, भय आणि दारिद्र्यातून मुक्ती मिळते.
5. त्रयोदशीला 13, चतुर्दशीला 14 आणि अमावस्येला 15 दिवे लावण्याची परंपरा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Diwali 2022 : श्री महालक्ष्मी स्तोत्र आणि त्याचे महत्त्व