Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देव उठनी एकादशी व्रत करण्याचे 10 फायदे

देव उठनी एकादशी व्रत करण्याचे 10 फायदे
, शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (12:10 IST)
देवउठनी एकादशीला प्रबोधिनी एकादशी देखील म्हणतात. या दिवसापासून विवाह, गृहप्रवेश, जातकर्म संस्कार इतर सर्व कार्य प्रारंभ होऊन जातात. तर चला जाणून घ्या या दिवशी व्रत ठेवण्याचे 10 फायदे-
 
विशेष: या दिवशी निर्जल किंवा केवळ एकदा द्रव्य पदार्थांवर उपास केला पाहिजे. व्रत करत नसल्यास या दिवशी तांदूळ, कांदा लसूण, मास, मदिरा, शिळं अन्न याचे सेवन मुळीच करु नये.
 
1. पाप नष्ट होतात : एकादशी व्रत केल्याने अशुभ संस्कार नष्ट होतात आणि मोक्षाची प्राप्ती होते.
 
2. तुळशी पूजा : या दिवशी शालीग्रामसह तुळशीचा आध्यात्मिक विवाह करण्याची परंपरा आहे. या दिवशी तुळशी पूजेचं महत्व आहे. याने अकाल मृत्युचा भय राहत नाही. शालीग्राम आणि तुळशीची पूजा केल्याने पितृदोष दूर होतं.
 
3. विष्णू पूजा : या दिवशी भगवान विष्णू किंवा आपल्या इष्ट-देवाची उपासना केली पाहिजे. या दिवशी "ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः "मंत्राचा जप केल्याने लाभ प्राप्त होतं.
 
4. चंद्र दोष : कुंडलीत चंद्र कमजोर असल्याच्या स्थितित पाणी आणि फळ खाऊन किंवा निर्जल एकादशी उपास करावं. सर्व एकादशी व्रत करणार्‍या भक्तांचा चंद्र योग्य होऊन मानसिक स्थितीत सुधार होतो.
 
5. कथा श्रवण किंवा वाचन: या दिवशी पौराणिक कथा श्रवण किंवा वाचन केल्याने पुण्य प्राप्ती होते.
 
7. अश्वमेघ व राजसूय यज्ञाचं फळ : असे म्हणतात की देवोत्थान एकादशी व्रत केल्याने हजार अश्वमेघ व शंभर राजसूय यज्ञ केल्याचं फळ प्राप्त होतं.
 
8. पितृदोषापासून मुक्ती : पितृदोषाने पीडित लोकांनी या दिवशी विधीपूर्वक व्रत केलं पाहिजे. पितरांसाठी हा उपास केल्याने अधिक लाभ प्राप्त होतं ज्याने त्यांचे पितृ नरकाच्या दु:खापासून मुक्त होतात.
 
9. भाग्य उजळतं : देवउठनी किंवा प्रबोधिनी एकादशी व्रत केल्याने भाग्य उजळतं.
 
10. धन आणि समृद्धी : पुराणांप्रमाणे जी व्यक्ती एकादशी करते ती जीवनात कधीही संकटाला सामोरा जात नाही. त्यांच्या जीवनात नेहमी धन आणि समृद्धी येत असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शनिवारी जपावे हे 5 चमत्कारी मंत्र