Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 16 April 2025
webdunia

भाऊबीज कविता

Bhau Beej
, रविवार, 3 नोव्हेंबर 2024 (09:36 IST)
कळकळ अंतरीची वसते परस्पर ह्रदया,
आज ओवाळींन मी तुजला भाऊराया,
कित्ती भांडणे केली, खोड्या केल्यात कित्तीतरी,
पदार्थ तुझ्या आवडीचा खाता, आठवण येतेच मनांतरी,
नकळत निघते मुखातून, काय काय आवडते तुजला,
नसलास जरी तू तिथे, आवड तुझी ठाऊक रे मजला,
एकच वस्तू लहानपणी वाटून होती घेतली,
आठ्व आज ती येता, पापणी होते ओली,
प्रत्येक भावास एक बहीण असावी,
बहिणीसही हक्काने जावयास एक जागा असावी,
निघतात मग विषय, किस्से बालपणी चे,
तेवढेच हलके होते रे , ओझे मनावरचे!!
..अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाऊबीज आणि यमराजाचा काय संबंध, जाणून घ्या कशी झाली यम द्वितीयेची सुरुवात