दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आहे. जाणून घ्या हिंदू धर्मात या प्रसंगी महालक्ष्मी देवीसह कोणत्या देवी- देवतांचे पूजन केले पाहिजे ज्याने घरात सुख- समृद्धी नांदते.
गणपती: कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणपतीची पूजा केली जाते. पूजन करण्यापूर्वी गणपतीच्या उजव्या बाजूला स्वस्तिक आणि डाव्या बाजूला ॐ चिन्ह काढावं. वास्तूप्रमाणे असे केल्याने सुख- शांती प्राप्त होते.
लक्ष्मी: देवी लक्ष्मी धन, संपदा, समृद्धी प्रदान करणारी आहे. कमळ हे देवीचं प्रिय फूल आहे. म्हणून हातात कमळ आणि दोन्ही हातातून धन वर्षा होत असलेल्या आणि आसनावर स्थिर लक्ष्मीचा फोटो पूजा घरात ठेवावा.
सरस्वती: देवी सरस्वती विद्या, बुद्धी, ज्ञान आणि वाणी याची अधिष्ठात्री देवी आहे. ज्ञानामुळे धन आणि बळ मिळतं. ज्ञानाविना धन आणि समृद्धी व्यर्थ आहे असे मानले जाते. सरस्वती देवीची बागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादिनी आणि वाग्देवी सह अनेक नावाने पूजा केली जाते.
कुबेर: रावणाचा सावत्र भाऊ कुबेरला महादेवाने 'धनपाल' होण्याचा वरदान दिला होता. देवतांचे खजिनदार म्हणून ओळखले जाणारे कुबेरचे पूजन केल्याने धनासंबंधी सर्व समस्या दूर होतात. म्हणूनच पूजेत लक्ष्मी, गणेश आणि सरस्वती यांच्यासह कुबेरचा फोटोही ठेवावा.