Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळीची पौराणिक कथा

diwali
, रविवार, 12 नोव्हेंबर 2023 (09:15 IST)
हिंदू धर्मात प्रत्येक सणाने बऱ्याच धार्मिक मान्यता आणि कथा जोडलेल्या आहेत. दिवाळीबद्दल देखील दोन पौराणिक कथा प्रचलित आहे.
 
1. कार्तिक अमावास्येच्या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षानंतर वनवास करून आणि लंकापती रावणचा नाश करून अयोध्या आले होते. या दिवशी भगवान राम यांच्या अयोध्येत आगमनाच्या आनंदाने लोकांनी दिवे लावून उत्सव साजरा केला होता. तेव्हा पासून दिवाळीची सुरवात झाली.
 
2. एक अन्य कथेनुसार नरकासुर नावाच्या राक्षसाने आपल्या असुर शक्तींनी देवता आणि ऋषींना खूप त्रास दिला होता. या राक्षसाने साधू संतांच्या सोळा हजार स्त्रियांना बंदी बनवले होते. नरकासुरच्या वाढत्या अत्याचाराने चिंतीत देवी - देवता आणि साधू-  संतांनी भगवान श्री कृष्णाकडे मदत मागितली. भगवान श्री कृष्णाने नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध करून सर्वांना त्याच्या आतंकाने मुक्ती दिली. सोबतच सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले. याच्या आनंदात दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्याच्या अमावास्येला लोकांनी आपल्या घरात दिवे लावले. तेव्हा पासून नरक चतुर्दशी आणि दीपावलीचा सण साजरा केला जातो.
 
या व्यतिरिक्त दिवाळीला घेऊन अजून पौराणिक कारणं आहेत- 
धार्मिक मान्यतेनुसार ह्या दिवशी भगवान विष्णूने राजा बळीला पातळ लोकांचा स्वामी बनवले होते आणि इंद्राने स्वर्गाला सुरक्षित पाहून आनंदात दिवाळी साजरी केली होती.
 
याच काळात समुद्र मंथनाच्या काळात क्षिरसागराने लक्ष्मी प्रगट झाली होती आणि त्यांनी भगवान विष्णूला पतीच्या स्वरूपात स्वीकार केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Diwali 2023 Wishes दिवाळीच्या शुभेच्छा