Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नरक चतुर्दशीसाठी घरगुती उटणे तयार करण्याची सोपी पद्धत

Homemade Utane
, रविवार, 19 ऑक्टोबर 2025 (21:22 IST)
नरक चतुर्दशीला उटणे लावून स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा, पाप आणि नरक भय दूर होते, अशी श्रद्धा आहे. तसेच तुम्ही देखील घरगुती उटणे नक्कीच तयार करू शकतात. आपल्या घरात असलेल्या साहित्यापासून उटणे बनवणे अगदी सोपे आहे. या घरगुती उटण्यामध्ये असलेले घटक त्वचेला स्वच्छ आणि मऊ करतात व त्वचेला थंडावा आणि सुगंध देतात. तसेच तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीनुसार घरीच नरक चतुर्दशीसाठी घरगुती उटणे तयार करू शकता आणि अभ्यंग स्नानाचा विधी पूर्ण करू शकता.

घरगुती उटणे
साहित्य-
बेसन पीठ- दोन चमचे
हळद-अर्धा चमचा  
चंदन पावडर- अर्धा  चमचा
मुलतानी माती-एक चमचा
गुलाब पाणी
दूध
उत्कटारा पावडर- एक चमचा
वाळलेली तुळशीची पाने पावडर- अर्धा चमचा  

कृती-
एका स्वच्छ वाटीत चण्याचे पीठ, हळद, तीळ पावडर, चंदन पावडर, मुलतानी माती आणि उत्कटारा पावडर एकत्र करा. तुळशीची पाने बारीक कुटून मिश्रणात घाला. आता मिश्रणात हळूहळू गुलाब पाणी किंवा दूध घालून एकजीव पेस्ट बनवा. पेस्ट जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावी. ती त्वचेवर सहज लावता येईल अशी मध्यम गाढी असावी. जर त्वचा कोरडी असेल तर थोडे तूप मिसळू शकता. जर तुम्ही उटणे एकाच वेळी वापरणार नसाल, तर कोरड्या स्वरूपात म्हणजेच पाणी किंवा दूध न वापरता एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. व वापरताना गरजेनुसार पाणी किंवा दूध मिसळा.
ALSO READ: Narak Chaturdashi 2025:अभ्यंग स्नानाचा धार्मिक अर्थ आणि योग्य पद्धत
तसेच नरक चतुर्दशीच्या पहाटे सूर्योदयापूर्वी शरीरावर सुगंधित तेल लावून हलक्या हाताने मालिश करा.
त्यानंतर तयार केलेले उटणे संपूर्ण शरीरावर लावा. विशेषतः हात, पाय, पाठ आणि चेहर्‍यावर हलक्या हाताने मसाज करा. कमीतकमी दहा मिनिटे उटणे त्वचेवर राहू द्या, जेणेकरून ते त्वचेची खोल स्वच्छता करेल. नंतर कोमट पाण्याने स्नान करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Naraka Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला काय करावे आणि काय टाळावे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नरक चतुर्दशीला कोणत्या पदार्थांचे नैवेद्य दाखवावेत? सोपी रेसिपी देखील वाचा