Naraka Chaturdashi नरक चतुर्दशी पूजा विधी आणि नियम
दिवाळी हा हिंदूंचा मोठा पावित्र्य सण आहे. दिवाळीची सगळे आतुरतेने वाट बघत असतात. आज आम्ही आपल्याला दिवाळीच्या संदर्भात काही अश्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या आपल्याला कदाचितच माहित असतील.
1 दिवाळीच्या एक दिवसापूर्वी साजरा केला जाणारा सण म्हणजे नरक चतुर्दशी. याला छोटी दिवाळी असे ही म्हणतात आणि या दिवशी मृत्यूचे देव यमदेव आणि हनुमानाची पूजा केली जाते.
2 आश्विन कृष्ण पक्षाची चतुर्दशी (छोटी दिवाळी) ला नरक चतुर्दशी देखील म्हणतात. नरक चतुर्दशीला यमराज आणि बजरंगबली मारुतीची पूजा करतात. आख्यायिका अशी आहे की याच दिवशी बजरंगबलीचा जन्म झाला होता.
3 आख्यायिकेनुसार या दिवशी मध्यरात्री मारुतीचा जन्म अंजनी मातेच्या गर्भातून झाला. हेच कारण आहे की सर्व प्रकाराचे सुख, आनंद आणि शांततेच्या प्राप्तीसाठी नरक चतुर्दशीला हनुमानाची उपासना किंवा पूजा करणे फायदेशीर ठरतं.
4 या दिवशी शरीराला तिळाचे तेल लावून उटण्याने अंघोळ करतात आणि त्या नंतर हनुमानाची विधियुक्त पूजा करून त्यांना शेंदूर अर्पण करतात.
5 छोटी दिवाळीला घराच्या नरकाला म्हणजेच घाण स्वच्छ केले जाते. ज्या ठिकाणी सौंदर्य आणि स्वच्छ स्थळ असतं, त्या ठिकाणी लक्ष्मी आपल्या कुळासह वास्तव्यास येते. या दिवशी यमराजांसाठी एक दिवा दक्षिण दिशेला तोंड करून तेवतात. जेणे करून यमराज प्रसन्न राहतील. तसेच अवकाळी मृत्यू होऊ नये आणि मृत्यू नंतर नरकाऐवजी विष्णुलोकात जागा मिळावी.
6 नरक चतुर्दशीला लोक यमराजाची पूजा करून आपल्या परिवारासाठी नरकापासून मुक्तता होण्यासाठीची प्रार्थना करतात. तसेच चुका टाळण्यासाठी दिलगिरी व्यक्त करतात. नरक चतुर्दशीला मुक्ती मिळविण्याचा सण देखील म्हणतात. या दिवशी दीर्घायुष्यासाठी घराच्या बाहेर यमदीप लावण्याची प्रथा आजतायगत आहे. आज देखील रात्री घराचे सर्व मंडळी घरी आल्यावर घराचे मालक यमाच्या नावाचे दिवे लावतात.
7 बऱ्याच घरात या दिवशी रात्री घरातील सर्वात ज्येष्ठ सदस्य एक दिवा घेऊन लावून पूर्ण घरात फिरवतात आणि मग त्याला घरापासून फार लांब ठेवून येतात. घरातील सदस्य घराच्या आतच राहतात आणि या दिव्याला यमाचा दिवा म्हणतात. असे मानले जाते की संपूर्ण घरात दिवा फिरवून बाहेर घेऊन जाण्यामुळे घराच्या सर्व वाईटपणा आणि वाईट शक्ती घराच्या बाहेर पडतात.
8 या रात्री दिवा लावण्याच्या प्रथेच्या संदर्भात बऱ्याच पौराणिक कथा आणि आख्यायिका आहेत. एक कथेनुसार आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी आणि दुर्दंत असुर नरकासुराचा वध केला आणि सोळा हजार शंभर मुलींना नरकासुराच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यांचा सन्मान केला. या निमित्ताने दिव्यांची आरास केली जाते.