Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेस्टिव्हलमध्ये ऑनलाईन खरेदी करताना हे 5 गोष्टी लक्षात ठेवा

फेस्टिव्हलमध्ये ऑनलाईन खरेदी करताना हे 5 गोष्टी लक्षात ठेवा
, मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (12:52 IST)
सध्या सणासुदीच्या काळात उत्सवाच्या हंगामात अमेझॉन, फ्लिपकार्ट, मंत्रा, पेटीएम मॉल सारख्या ऑनलाईन ई-कॉमर्स ऑनलाईन सेल (विक्री) घेऊन आले आहे. या उत्पादनावर अनेक सवलतींसह कॅशबॅकसह बरेच ऑफर आहेत, पण आपण ऑनलाईन सेलमध्ये शॉपिंग करीत असाल तर या काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 
 
सेलमध्ये बऱ्याच वेळा लोकांची फसवणूक केली जाते. आणि उत्पादन देखील वाईट मिळतात. जे नंतर परत करण्यात अडचणींना सामोरी जावे लागते. अश्या परिस्थितीत आपल्याला बऱ्याच गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
1 अत्यधिक सवलतींच्या उत्पादनांची तपासणी करा : जास्त सवलती उपलब्ध असलेली उत्पादने तपासा. बहुतेक सवलत दोन प्रकारचे असतात. एक तर ते जे उत्पादने बाजारपेठेत आणण्यात आले आहे त्यांची खप करणे आणि दुसरे म्हणजे असे उत्पादन जे राखून ठेवले आहेत त्यांचा स्टॉक संपवणे. म्हणून नवीन उत्पादने खरेदी करताना काळजीपूर्वक खरेदी करा. या उत्पादनांचे काहीही रिव्यू नसतात आणि आपण प्रथमच वापरणारे असता. दुसरं असे उत्पादने जे स्टॉक मधून सुटत नाही त्यांना खरेदी करण्याच्या पूर्वी हे बघावं की हे उत्पादने आपल्या कामाचे आहे किंवा नाही.
 
2 कॅश बॅक अटी समजून घ्या : कॅशबॅक ज्या उत्पादनासह प्राप्त होत आहे त्याच्या अटी समजून घ्या. बऱ्याच वेळा उत्पादनांवर कॅशबॅक कूपन मिळतात आणि ते कूपन वापरण्यासाठी वेगवेगळ्या अटी आणि मर्यादा असतात. काही उत्पादनांसह कॅशबॅक खात्यामध्ये येतं. ती ऑफर चांगली आहे. बऱ्याच वेळा बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी कॅशबॅक उपलब्ध असतं.
 
3 रिटर्न पॉलिसी असणं महत्त्वाचं आहे : जेव्हा आपण एखादी वस्तू सेल मधून घेता तर त्याची रिटर्न पॉलिसी काय आहे ते तपासून घेणे. बऱ्याच वेळा लोक अधिक सवलत बघून वस्तू खरेदी करतात परंतु त्यांना आवडत नसल्यामुळे किंवा त्याची गुणवत्ता (क्वालिटी)चांगली नसल्यामुळे परत केल्यावर ते परत घेत नाही.
 
4 शिपिंग कॉस्टची काळजी घेणं : ऑनलाईन वस्तूची किंमत वेगळी असते पण शिपिंग शुल्क लावल्यावर देय देण्याच्या वेळी वस्तूच्या किमतीत वाढ होते. म्हणून देय देण्यापूर्वी हे तपासून घ्या की त्या उत्पादनाचे शिपिंग शुल्क किती आहे? बऱ्याचदा ऑनलाईन उत्पादने खरेदीवर हँडलिंग शुल्क वाढतात.
 
5 किमतीची तुलना करा : जर आपण ऑनलाईन विक्रीमध्ये एखादे उत्पादन खरेदी करत असाल तर तेच उत्पादने दुसऱ्या साईटवर तपासून त्यांची तुलना करा जेणे करून आपल्याला त्या उत्पादनाची किंमत आणि गुणवत्ता किंवा क्वालिटी कळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छत्रपतींचे कुलदैवत तुळजापूरची श्री तुळजाभवानी