Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धनत्रयोदशीला चुकूनही या 8 वस्तू खरेदी करु नये

धनत्रयोदशीला चुकूनही या 8 वस्तू खरेदी करु नये
, शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (09:30 IST)
दिवाळीपूर्वी पुष्य नक्षत्र आणि धनत्रयोदशीला खरेदी केली जाते. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू शुभ फल देतात आणि अक्षय राहतात असे म्हटले जाते. तर चला जाणून घेऊया धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करावी आणि काय खरेदी करू नये-
 
धनत्रयोदशीला काय खरेदी करावे: सोने, चांदी, पितळ, तांबे, धणे, खाते, कपडे, झाडू, पिवळ्या कवड्या, मीठ, धार्मिक साहित्य, औषधी, खेळणी, हार, सजावटीच्या वस्तू, धनत्रयोदशीच्या दिवशी गणेशजी आणि माता लक्ष्मीची मूर्ती, श्रीयंत्र, दक्षिणवर्ती शंख, कमळगट्टा हार, चांदीची नाणी, दागिने, मातीची भांडी, दिवे इत्यादी वस्तू खरेदी करू शकतात.
 
चला तर मग जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही कोणत्या 8 वस्तू खरेदी करू नयेत.
 
1. लोखंड : लोखंड शनीचा धातू आहे, हे घरात आणल्याने अशुभ घडू शकतं.
 
2. अॅल्युमिनियम : अॅल्युमिनियम हा राहूचा धातू आहे, त्यामुळेही घरामध्ये दुर्दैव निर्माण होते.
 
3. स्टील: स्टील देखील लोखंड आहे. ते विकत घेतल्याने घरात गरिबी येते.
 
4. प्लास्टिक: प्लास्टिक खरेदी केल्याने भरभराटीवर उलट प्रभाव पडतो.
 
5. काच: काच किंवा काचेची भांडी देखील राहूचीच वस्तू आहेत, ज्यामुळे राहु घरात प्रवेश करतो.
 
6. काळ्या रंगाचे कपडे: या दिवशी काळ्या किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे घालू नका.
 
7. तेल किंवा तूप : या दिवशी तेल किंवा तूप खरेदी करू नये.
 
8. चीनी मातीची भांडी:  या दिवशी चीनी मातीची भांडी खरेदी करू नये कारण असे मानले जाते की यामुळे घरातील प्रगतीत अडथळे निर्माण होतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शनीप्रदोष व्रत : शनी प्रदोष व्रताचे महत्त्व जाणून घ्या, आणि हे 10 सोपे उपाय करून बघा ....