Article Deepawali Marathi %e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80 %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b2 %e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%a1%e0%a5%80 %e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a5%80 112110500015_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळी स्पेशल, रबडी जिलेबी

दिवाळी स्पेशल
WD
साहित्य - जिलेबीसाठी २५0 ग्रॅम मैदा, २ टे. स्पू रवा, २ टे. स्पू. डाळीचं पीठ, १ वाटी आंबट दही, मोहनासाठी ३ टे. स्पू. तेल किंवा तूप, ४ वाटी साखर, १ टी. स्पू. लिंबाचा रस, केशरी रंग आणि तळण्यासाठी तूप.

कृती - मैदा, रवा आणि डाळीचं पीठ एकत्र करावं. त्यात दही व थोडं कोमट पाणी घालून भजीच्या पिठाइतपत ते सरबरीत भिजवावं. तीन-चार तास पीठ तसंच ठेवावं. मग त्यात मोहन आणि थोडा केशरी रंग घालून पीठ चांगलं फेटावं. एका भांड्यात साखरेचा एकतारी पाक करून त्यात थोडा केशरी रंग व लिंबाचा रस घालून पाक कोमट ठेवावा. कढईत तूप तापवावं. जाड प्लॅस्टिकच्या पिशवीला भोकं पाडून त्यात जिलेबीचं मिश्रण टाकून गोल गोल जिलेब्या घालाव्या. तळून लालसर कुरकुरीत झाल्या की, तुपातून काढून पाकात टाकाव्या. दोन मिनिटं पाकात ठेवून पाकातून काढून घ्याव्या. रबडीसाठी - दूध मोठय़ा कढईत आटवून घ्यावं. त्यात साखर व ड्रायफ्रूटस् घालून दूध निम्मं होत आलं की गॅसवरून उतरवून घ्यावं. त्यात जायफळ - वेलची पूड व केशर काड्या घालाव्या. खोलगट काचेच्या बाऊलमध्ये जिलब्या ठेवून त्यावर सुका मेवा आणि मलई रबडी घालावी. आणि वर चांदीचा वर्ख घालून ती खाण्यास द्यावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi