या दिवाळीत तुमच्यातील लक्ष्मीचे पूजन करा
- श्रीमती भानुमती नरसिंहन
लक्ष्मी ही धन- संपत्ती आणि समृद्धीची देवता आहे. उपजीविकेसाठी आणि जीवनात प्रगती करण्यासाठी एक अत्यावश्यक घटक म्हणून आपल्याला धन संपत्ती मिळालेली आहे. केवळ पैसा असण्यापेक्षाही जास्त ते बरेच काही आहे. मुबलक प्रमाणात ज्ञान,कौशल्ये आणि कला असणे असा त्याचा अर्थ आहे. लक्ष्मी ही अशी शक्ती आहे जी आपल्या आध्यात्मिक आणि भौतिक अशा सर्व दृष्टीकोनातून संपूर्णपणे अभिव्यक्त होते.
लक्ष्मीचा संबंध लक्ष्याशी म्हणजे ध्येयाशी आहे. ती अशी शक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या मूळ स्रोताकडे, म्हणजेच तुमच्या लक्ष्याकडे घेऊन जाते. ही शक्ती आठ रुपांमधून आपल्यावर कृपेचा वर्षाव करत असते.