Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रमा एकादशी आणि वसुबारसही

रमा एकादशी
, शनिवार, 7 नोव्हेंबर 2015 (12:25 IST)
आश्विन कृष्ण एकादशी ही दीपोत्सवाचा पहिला दिवस. त्याने नावच रामा एकादशी. रमा शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी. देव-दानवांच्या समुद्रमंथनातून 14 रत्ने लाभली. त्यातील पहिलेच नाव आहे लक्ष्मी. (आणि 14वे रत्न अमृत) तिच्या नावे एकादशी म्हणून ही रमा एकादशी. दीपलक्ष्मीच्या पूजा प्रार्थनेनेच दीपावली सप्ताहाचा शुभारंभ होतो. प्रात: काळी दीपज्योती उजळून दीपलक्ष्मीची प्रार्थना करून शत्रुत्वाच्या नाशाच्या प्रार्थनेने दिवाळीचा श्रीगणेशा करायचा. 
 
प्रतिवर्षी दीपोत्सवी सप्ताहातील एकादशी, द्वादशी हे दोन दिवस स्वतंत्र असतात. यावर्षी मात्र एकादशी दुपारी संपून नंतर सुरू होते द्वादशी. ती रविवारी दुपारी संपते. त्यामुळे वसुबारस (गोवत्स-द्वादशी) हा कार्यक्रम आज संध्याकाळीच करायचा. घरातील गोठ्यातूऩ गोशाळांतून दीपोत्सवाने गाय-वासरांचे पूजन करावे. गोवत्स पूजन हे आपल्या कृषी संस्कृतीचे द्योतक आहे. 
- पं. वंसतराव गाडगीळ 

Share this Story:

Follow Webdunia marathi