Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विशेष दिवाळी मंत्र करा राशीनुसार

लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे सोपे उपाय

दिवाळी
मेष : ही दिवाळी तुमच्यासाठी फारच शुभकारी आहे. याला टिकवण्यासाठी दिवाळीच्या दिवशी पिवळ्या आसनावर बसून 'ॐ पीतांबरायै नमः' या मंत्राचा 57 माळांचा जप करावा.

वृषभ : या दिवाळीत तुम्हाला उत्तम फळ मिळणार आहे. चारीबाजूने यश मिळेल. प्रतिकूलतेच्या नाशासाठी दिवाळीला 'ॐ दुं दुर्गायै नमः' मंत्राची 51 माळांचा जप करावा.

मिथुन : दिवाळी तुमच्यासाठी उत्तम भविष्याचे संकेत देत आहे. तुम्हाला थोडीफार मानसिक अशांती होऊ शकते. 'ॐ पुष्टयै नमः' या मंत्राची 55 माळांचे जप केल्याने शांती मिळेल.

कर्क : यंदाची दिवाळी तुम्हाला प्रसन्नता देणार आहे. पण आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्यासाठी 'ॐ श्रद्धायै नमः' या मंत्राचा 51 माळांचे जप करावे.

सिंह : ही दिवाळी तुमच्या घरी फार फार आनंद घेऊन येणार आहे. मनावर ताबा ठेवणे जरूरी आहे, तसेच वाणीवर संयम ठेवणे त्यापेक्षाही जास्त गरजेचे आहे. 'ॐ मेघायै नमः' या मंत्राच्या 51 माळांचा जप जरूर करावे.

कन्या : यंदाच्या दिवाळीत तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे. पण खर्च करताना विचार जरूर करावा अन्यथा आर्थिक स्थिती खालावू शकते. त्यासाठी 'ॐ श्रियै नमः' मंत्राचा जप अवश्य करावा.

तूळ : दिवाळी 2011 तुमच्या राशीसाठी मध्यम शुभ आहे पण तुम्ही केलेले चांगले कर्म आणि दान धर्माची प्रवृती याला अती शुभतेत बदलू शकते. 'ॐ श्री राजलक्ष्म्यै नमः' या मंत्राचे 55 माळांचा जप करावा.

वृश्चिक : ही दिवाळी तुमच्या जीवनात बरेच नवीन अनुभव घेऊन येणार आहे. नवीन खुशखबर, नवीन यश तुम्हाला आर्श्चयचकित करणार आहे. तुमची वाणी अनियंत्रित नसायला पाहिजे म्हणून 'ॐ सरस्वत्यै नमः' या मंत्राचा दिवाळीच्या दिवशी 108 वेळा जप करावा.

धनू : ही दिवाळी तुमच्यासाठी बरेच आव्हान घेऊन येणार आहे. पण तुमचा पराक्रम याला जिंकून घेईल. 'ॐ लक्ष्म्यै नमः' या मंत्राचा 51 माळांचा जप दिवाळीला अनुकूल बनवेल.

मकर : यश, सुख, समृद्धी, वैभव, कीर्ती, आनंद, यश हे सर्व या दिवाळीत तुम्हाला भेटण्यास येत आहे. 'ॐ श्रीमात्रे नमः'या मंत्राचे जप केल्याने तुमच्या प्रगतीत वाढ होईल.

कुंभ : यंदाची दिवाळी तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणींना मात करण्यासाठी येत आहे. तुमच्या प्रगतीत वाढ होईल. 'ॐ योगलक्ष्म्यै नमः' या मंत्राची 55 माळेचे जप केल्याने दिवाळीची रोषणाई अधिक वाढवणार आहे.

मीन : ही दिवाळी तुमच्या जीवनातील सर्वात शुभ दिवाळी आहे. थोडेफार कष्टांकडे नजरअंदाज केले तर ही दिवाळी तुम्हाला भरपूर आनंद देणार आहे. पैशाची चणचण राहणार नाही. 'ॐ महाकाल्यै नमः' या माळेचे 51 वेळा जप करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi