Article Deepawali Marathi %e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%ae %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af %e0%a4%a8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0 %e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%ad %e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b9%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4 109101200020_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोम पुष्य नक्षत्र...शुभ मुहूर्त!

- ज्यो. डॉ. रामकृष्ण तिवारी

सोम पुष्य नक्षत्रशुभ मुहूर्त
WD
विष्णूची अर्धागिनी अर्थात लक्ष्मीची आश्विन महिन्यात उपासना केली जाते. त्यामुळे या महिन्यात येणार्‍या पुष्य नक्षत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा आलेले नक्षत्र सर्वार्थसिध्दी योग युक्त असून रवि व सोमवारद्वारा अलंकृत झाले आहे. रविवारपासून सुरू झालेले पुष्य नक्षत्र खरेदीचा शुभ मुहूर्त घेऊन आले आहे. सोमवारी दिवसभर शुभ योग आहे.

सोमवार सूर्योदयाच्या आधीपासून दिवस संपेपर्यंत खरेदीचा शुभ योग असून आज आपल्या कुळ परंपरेनुसार वार्षिक व्यवहारासाठी वही, पेन तसेच इतर सामग्री खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त आहे. आजच्या दिवशी दान करणेही श्रेष्ठ मानले जाते. या शुभकाळात चांगले कर्म केल्याने शुभफळ हे निश्चित मिळत असते.

शुभ मुहूर्त -
सकाळी 6.02 ते 7.50 हा काळ अमृत मुहूर्ताचा काळ असून घरातून बाहेर निघताना दही सेवन केले पाहिजे.

सकाळी 9.18 ते 10.45 या वेळेत शुभ मुहूर्त आहे. देवाची आराधना करून चांगले कर्म केले पाहिजे.

दुपारी 1.40 ते 3.07 याकाळात शुभ कार्य करण्यासाठी निघण्यापूर्वी देवासमोर अगरबत्ती लावली पा‍हिजे.

दुपारी 3.07 ते 4.34 या वेळेत गूळ व धणे खावेत.

संध्या 4.34 ते 6.02 वेळेत देवाला वाहिलेले फूल आपल्या जवळ ठेवावे.

संध्या 6.02 ते 7.35 वेळेत अंगावरील कपड्यांना अत्तर लावून घराबाहेर निघावे.

सकाळी 9.03 ते 11.18 वेळेत बाजारात खरेदी करण्यासाठी निघण्‍यापूर्वी लाल रंगाचे कपडे परिधान करावे अथवा लाल रूमाल खिशात ठेवावा. तसेच चंदनाचा गंध आपल्या कपाळावर लावावा.

दुपारी 3.10 ते 4.44 पर्यंत कुंभ लग्न काळ आहे. यावेळे दरम्यान खरेदीसाठी जाण्यापूर्वी कलश दर्शन करणे शुभ फलदायी आहे.

रात्री 7.55 ते 9.33 वेळे दरम्यान वृषभ लग्न काळ आहे. यावेळेत पांढर्‍या रंगाचे वस्त्र परिधान करून देवाला पांढरे फूल व तांदूळ अर्पण करावेत. अशा पध्दतीने सोमपुष्य नक्षत्राचा लाभ घेतला पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi