rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्लीत पुन्हा आपची झाडू, भाजप- काँग्रेस साफ

AAP
, मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (17:40 IST)
दिल्ली विधानसभेचे निकाल जवपास स्पष्ट झालं असून आम आदमी पक्षानं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. भाजपला मागील वेळेपेक्षा काही जागांवर आघाडी मिळाली आहे परंतू काँग्रेसचा सूपडा मात्र साफ झाला आहे. आपचे अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचा ताज डोक्यावर चढवण्यासाठी सज्ज झालेत.
 
अरविंद केजरीवाल यांनी जनतेचे आभार मानत भष्ट्राचार विरोधी पक्षाला निवडण्याबद्दल शुभेच्छा दिल्या. दिल्लीकरांनी त्यांच्या मुलावर विश्वास ठेवला असे देखील केजरीवाल यावेळी म्हणाले.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांचा आज वाढदिवस आहे. 'आप'ला मिळालेल्या यशानंतर त्यांनी हे "आतापर्यंतचं सर्वात मोठं गिफ्ट मिळालं आहे. हा सत्याचा विजय झाला आहे. मूळ प्रश्नांवर राजकारण करायला हवं. राजकीय पक्षांनी यातून शिकलं पाहिजे," असं म्हटलं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोने झालं स्वस्त, जागतिक बाजारात भाव उतरला