दिल्लीत शनिवारी सायंकाळी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील गुन्हेगारांबद्दल महत्वाची माहिती हाती लागल्याचा दावा पोलिसांनी केला असून आतापर्यंत आठ जणांना ताब्यात घेतले असून 5 प्रत्यक्षदर्शींकडून सखोल चौकशी केली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले, की या घटनेची माहिती देणा-या पाच प्रत्यक्षदर्शिंच्या माहितीवरून व वर्णनावरून या कटात सहभागी असलेल्यांपर्यंत पोचणे पालिसांना शक्य होणार आहे.
या साक्षीदारांमध्ये एक 12 वर्षांचा फुगेवाला मुलगा ही आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून या हल्ल्यातील आरोपींपर्यंत पोचण्यास मदत मिळणार आहे. यातील संशयितांचे स्केच तयार करण्याचे काम सुरू असून सकाळपर्यंत स्केचेस जाहीर करण्यात येतील.