Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाककडून बॉम्बस्फोटाचा निषेध

पाककडून बॉम्बस्फोटाचा निषेध

वार्ता

राजधानी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेबद्दल तीव्र निषेध व्यक्त करत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी व पंतप्रधान यूसुफ रजा गिलानी यांनी पाकिस्तान भारतीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले.

या बॉम्बस्फोटांबद्दल दोन्ही नेत्यांनी घडलेल्या अप्रिय घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असल्याचे पाक पराराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

हे काम मानवतेच्या शत्रूंचे असून अशा प्रकारचे क्रूरकार्य करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पाकिस्तानचे सूचना मंत्री शेरी रहमान यांनी केली. सर्वांनी मिळून दहशतवादाचा सामना करण्याचा निश्चय व्यक्त करत पाकिस्तान या दु: खाच्या घटनेत भारतीयांबरोबर असल्याचेही रहमान यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi