केंद्र सरकारने सिमी (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) वर बंदी करताच याचकालावधीत बॉम्बस्फोट झाल्याने सिमीवर संशय व्यक्त केला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सिमीवर प्रतिबंध घातल्यानंतर केंद्रीय गुप्तचर एजन्सीने दिल्ली आणि उत्तर प्रदेशात दहशतवाद्यांकडून स्फोट घडवून आणण्याची शक्यता वर्तवली होती. जयपूर आणि अहमदाबादामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर आठ ऑगस्ट रोजीच गुप्तचर एजन्सीने ही शक्यता वर्तवली होती.
एजन्सीने उत्तर प्रदेश पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिमीवर करण्यात आलेल्या बंदीमुळेच बॉम्बस्फोट घटवून आणण्यात आल्याची शक्यता आहे.