Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मास्‍टर माईंड ताब्‍यात असल्‍याचा पोलिसांचा दावा

मास्‍टर माईंड ताब्‍यात असल्‍याचा पोलिसांचा दावा

वेबदुनिया

बॉम्‍बस्‍फोटातील मुख्‍य सुत्रधार सापडला असून त्‍याच्‍यासह 6 जणांना दिल्‍ली पोलिसांनी ताब्‍यात घेतल्‍याचा दावा केला आहे. दिल्‍लीत 26 मिनिटांत 5 बॉम्‍बस्‍फोट घडवून 18 जणांचा जीव घेणा-या व्‍यक्‍तीस एका फुगे विक्रेत्‍या मुलाने पाहिले असून त्‍याने केलेल्‍या वर्णनावरून 6 जणांना अटक करण्‍यात आली आहे.

दरम्‍यान, आणखी 4 ठिकाणचे बॉम्‍ब निकामी करण्‍यात पथकाला यश आले आहे. या हल्‍ल्‍याची जबाबदारी सिमीच्‍याच इंडीयन मुजाहिदीन या संघटनेने घेतली आहे. या हल्‍ल्‍यातील प्रत्‍यक्षदर्शींनी केलेल्या वर्णनावरून 6 जणांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi