दहशतवाद रोखण्यासाठी दिल्लीत होत असलेले आंतराष्ट्रीय संमेलन सुरू होण्यापूर्वीच दोन दिवस पूवीच दहशतवाद्यांनी दिल्लीत बॉम्बस्फोट घडवून राजधानी हादरून सोडली.
पोलिसप्रमुख आंतराष्ट्रीय असोसिएशनच्या वतीने आयोजीत आशिया शाखेचे हे संमेलन 15 व 16 सप्टेंबर असे दोन दिवस चालणार आहे. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन प्रमुख वक्ते असणार आहेत. यामध्ये जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, पाकिस्तान, बांगलादेश आदींचा सहभाग असणार आहे. मात्र, संमेलन सुरू होण्याच्या दोन दिवस पूर्वीच दिल्लीतच बॉम्बस्फोट झाल्याने या परिषदेवर अनिश्चतेचे सावट पसरले आहे.