Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा - आर आर

पुणे-मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडक

महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा - आर आर
दिल्लीत दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्‍या बॉम्बस्फोट मालिकेचा निषेध नोंदवून गणेशोत्‍सव विसर्जन मिरवणूकांमध्‍ये कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी राज्‍यभर सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्‍याची माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली.

'वेबदुनिया'शी बोलताना त्‍यांनी सांगितले, की गुजरातमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली आणि मुंबईतही सतर्कतेचे इशारे दिले आहेत. झालेले बॉम्बस्फोट निंदनीय आहेत. यामागे ज्यांचा हात आहे त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच. महाराष्ट्रात अशा घटना घडू नये यासाठी गृहमंत्रालय दक्ष आहे. ‍रविवारी होणा-या गणेश विसर्जन मिरवणुकींमध्‍ये सतर्कतेचे इशारा दिला आहे.

महत्‍वाच्‍या ठिकाणांवर आणि गर्दीवर लक्ष ठेवण्‍यासाठी मुंबईसह पुण्‍यातही कडेकोट सुरक्षा व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून चौकाचौकात टॉवरवरून पोलिसांच्‍या टेहळणी पथकाची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. गर्दीच्‍या ठिकाणी बॉम्बशोधक पथकांचीही नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही मात्र पोलिसांना सहकार्य करण्‍याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi