Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेन्सर स्कॅनिंग मशीनद्वारे बॉम्ब निकामी

सेन्सर स्कॅनिंग मशीनद्वारे बॉम्ब निकामी

वेबदुनिया

नवी दिल्ली, , शनिवार, 13 सप्टेंबर 2008 (23:09 IST)
राजधानी दिल्लीत पाच ठिकाणी साखळी बॉम्ब स्फोट झाले तर शहारातील सेंटर पार्क परिसरात चार जिवंत बॉम्ब सेन्सर कॅनिंग मशीनच्या सहाय्याने तात्काळ निकामी करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

बॉम्ब स्फोटाची जबाबदारी स्विकारणार्‍या इंडियन मुजाहिदकडून आलेल्या ई-मेलमध्ये दिल्लीत नऊ बॉम्ब स्फोट करण्याचे म्हटले आहे. पाच बॉम्ब स्फोट झाले आहेत तर चार जिवंत बॉम्ब निकामी करण्यात दिल्ली पोलीसांना यश मिळाले आहे.

दहशतवाद्यांनी राजधानीत आणखी काही ठिकाणी बॉम्ब पेरून ठेवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने दिल्ली पोलिसांनी सेन्सार कॅनिंग मशीनने सापडलेले जिवंत बॉम्ब निकामी केले जात आहे. गेल्या महिन्यात गुजरातमधील सुरत येथे सापडलेले 18 जिवंत बॉम्ब कॅनिंग मशीनच्या सहाय्याने निकामी करण्यात आले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi