दिवाळीच्या दिवशी
दरापुढे सडा
ताईच्या रांगोळीने येणार्याची तर्हा
एक पाय लांबवर दुसरा पायरीवर
ताईची, तिच्या मैत्रिणीची मदार रांगोळीवर
छोटे छोटे ठिपके, छोटे छोटे बिंदू
कधि रेघांनी जुळतात, ताईच्या मनांत
रेंगाळतात-गालीच्याचा आकार
रांगोळी साकार कुठे त्रिकोण
कुठे चोकोन, कुठे सरळ तर कुठे
वाकलेली-सगळे रांगांनी सजलेले
जादुचा गालीचा लागला हसायला
अन् ताईला काहीतरी पुसू लागला.