Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेसन चिक्की

बेसन चिक्की

वेबदुनिया

WD
साहित्य - २ वाटी डाळीचं पीठ, १00 ग्रॅम मावा, २ टे. स्पू. खसखस, वेलची-जायफळ पूड, १५0 ग्रॅम साखर, अर्धी वाटी पाणी, केशरी रंग,म ड्रायफ्रूटस्चे काप आणि तूप.

कृती - डाळीच्या पिठात २ टे. स्पू. तुपाचं मोहन घालून ते घट्ट भिजवून ठेवावं. मग त्याची पोळी लाटून किंवा पुर्‍या लाटून तुपात तळून घ्याव्यात. पुर्‍या कुरकुरीत तळून मोडून घ्याव्या. नंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रवा करावा. मावा परतून रव्यात टाकावा. खसखस भाजून घ्यावी, साखरेत पाणी घालून त्याचा दोन तारी पाक तयार करावा. त्यात केशरी रंग घालावा. पाक तयार झाला की रव्याचं मिश्रण, खसखस आणि ड्रायफ्रूटस्चे काप त्यात टाकून मिश्रण चांगलं एकजीव करावं. बर्फीच्या ट्रेला तुपाचा हात फिरवून त्यात हे मिश्रण ओतावं. ते ट्रेमध्ये एकसारखं पसरवून ठेवावं. ते ४-५ तास तसंच राहू द्यावं आणि नंतर त्याच्या वड्या पाडाव्यात.

Share this Story:

Follow Webdunia marathi