बदामाचा हलवा खाण्यास अतिशय चविष्ट लागतो. यामध्ये बदाम सोलून त्याची पेस्ट बनवून तुपात भाजले जाते. सणानुसार, ही एक अतिशय शाही मिष्टान्न आहे. हिवाळ्यात तुम्ही गरम हलवा तयार करु शकता.
साहित्य:
दीड कप बदाम ( सहा ते सात तास पाण्यात भिजवून घ्या)
एक कप साखर
एक कप दूध
2 चमचे तूप
अर्धा चमचा वेलची पूड
बदाम हलवा कसा बनवायचा
1. बदाम पाण्यातून काढून सोलून घ्या.
3. बदामाची पेस्ट बनवण्यासाठी त्यांना ब्लेंडरमध्ये टाका आणि खडबडीत पेस्ट बनवा.
4. कढईत शुद्ध तूप गरम करा आणि त्यात बदामाची पेस्ट घाला.
5. यात साखर मिसळा आणि मंद आचेवर ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.
6. यात वेलची पूड घाला. हलवा तयार आहे, चिरलेल्या बदामांनी सजवा.