Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Bhai Dooj भावासाठी बनवा मलाई बर्फी रेसिपी जाणून घ्या

Bhai Dooj  भावासाठी बनवा मलाई बर्फी रेसिपी जाणून घ्या
, शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (22:35 IST)
Malai Barfi recipe :  दिवाळीचा सण केवळ भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पाच दिवस चालणार हा सण .वासू वारस पासून साजरा केला जातो.दिवाळी हा हिंदूंचा मोठा सण आहे. या सणांमध्ये लोक आपली घरे सजवतात आणि नवीन कपडेही घालतात. यासोबतच घरांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात.
 
भाऊ बीजेला बहिणी आपल्या भावांच्या कपाळी टिळा लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्याबदल्यात  भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई बाजारात उपलब्ध असते, त्यामुळे आरोग्य बिघडते.आपण भावासाठी घरीच मलाई बर्फी बनवू शकता. चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य- 
1 वाटी पनीर 
1/2 किलो मावा किंवा खोया
1 चमचा वेलची पावडर
चिरलेले  काजू
कंडेन्स्ड दूध 
2चमचे  किसलेल खोबरं
 
कृती-
सर्वप्रथम गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात कंडेन्स्ड मिल्क घाला. या कंडेन्स्ड मिल्कमध्ये मावा चांगले मिसळा. सतत ढवळत राहा.
 
यानंतर पनीर चे तुकडे व्यवस्थित मॅश करून पॅनमध्ये घाला. मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत ढवळत राहा. जेणेकरून त्यात कुठेही गुठळ्या राहणार नाहीत.
 
मिश्रण कढईतून वेगळे होऊन घट्ट होऊ लागल्यावर त्यात वेलची पूड घालून मिक्स करा. यानंतर एका ताटाला  तूप लावून बाहेर काढा.
हे सजवण्यासाठी वर काजू आणि बदाम टाका आणि हळुवार हाताने दाबून काप करून घ्या .आता थंड होऊ द्या.वरून किसलेल खोबर घालून गार्निश करा. तुमची मलई बर्फी खाण्यासाठी  तयार आहे. 
 










Edited by - Priya Dixit    
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Health Benefits of Jaggery: हिवाळ्यात गुळाचे सेवन करा, आरोग्यदायी फायदे जाणून घ्या