साहित्य - अननसाचा रस 4 वाट्या, साखर 8 वाट्या, पाणी 4 वाट्या, सायट्रिक अॅसिड दीड चमचा, अननसाचे इसेन्स जरूरीप्रमाणे, पोटॅशियम मेटाबाय सल्फाईट 1/2 चमचा.
कृती - अननसाची साल व डोळे पूर्णपणे काढून अननसाच्या बारीत फोडी कराव्यात व मिक्सर किंवा ज्युसरमधून रस काढावा. यंत्र नसेल तर फोडी शिजवून घेऊन बारीक गाळणीतून किंवा मलमलच्या पांढर्या फडक्यातून रस गाळावा.
नंतर साखरेचा पाकतयार करून त्यात अननसाचा रस व बाकीची द्रव्ये घालावे. इसेन्स व पिवळा रंग घालावा. सर्व मिसळून बाटलीत भरावे.