Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोटेटो सूप

पोटेटो सूप

वेबदुनिया

ND
साहित्य : बटाटा, 1 इंच आल तुकडा, 1 हिरवी मिरची, 1 कांदा, 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, 4 टोमॅटो, 1/4 कप दूध, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा काळे मिरे, चिमूटभर साखर, कोथिंबीर, 1 मोठा चमचा लोणी.

कृती : बटाटा, टोमॅटो, आलं, हिरवी मिरची व कांदा बारीक कापून घ्यावा. कापलेल्या भाज्यांना प्रेशर कुकरमध्ये घालून त्यात 4 कप पाणी, मीठ, काळे मिरे व साखर घालून शिजवून घ्याव्या. प्रेशर निघाल्यावर कुकराचे झाकण उघडावे. भाज्यांचे मिश्रण गार झाल्यावर त्यांना मिक्सरमधून फिरवून घ्यावे. व त्या मिश्रणाला सूपच्या चाळणीने गाळून घ्यावे. आता कॉर्नफ्लोअर व दुधाचा घोळ तयार करून भाज्यांच्या मिश्रणात घालावे. मिश्रणाला परत आच वर ठेवून एक उकळी येईपर्यंत उकळू द्यावे. तयार सुपामध्ये लोणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi