साहित्य : बारीक चिरलेले टोमॅटो चार कप, एका संत्र्याच्या फोडी, दोन गाजर बारीक काप केलेले, तीन कप पपीतेचे काप, एक चमचा लिंबाचा रस, दोन चमचे साखर, मीठ चवीनुसार, बर्फ आवश्यकतेनुसार.
कृती : सर्वप्रथम चिरून ठेवलेले फळांना एक कप पाण्यासोबत एकदा लिक्विडाइजरमधून फिरवून घ्यावे. नंतर त्याला गाळून ग्लासमध्ये ओतून वरून बर्फ घालून लगेचच सर्व्ह करावे. हे पेय पदार्थ स्वास्थ्याच्या दृष्टीने फारच उत्तम आहे, कारण याने दिवसभर लागणारे व्हिटॅमिन अ आणि सी ची पूर्ती होते.