शरीराला आरोग्यदायी ठेवण्याकरिता तुम्ही ब्रिकोली सूप नक्कीच ट्राय करू शकतात. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लो कॅलरी, कार्बोहायड्रेट असते. तसेच हे सूप वजन कमी करण्यासाठी देखील उपयोगी मानले जाते. तर चला जाणून घ्या ब्रोकोली सूप रेसिपी.
साहित्य-
ब्रोकोली
एक चमचा ऑलिव्ह ऑइल
पाच ते सहा लसूण पाकळ्या
कांदा बारीक चिरलेला
कढीपत्ता
एक मोठा चमचा दूध
चिमूटभर मिरे पूड
चिली फ्लेक्स
चवीनुसार मीठ
कृती-
ब्रोकोली सूप बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल घालावे. आता यामध्ये आता यामध्ये लसूण पाकळ्या, चिरलेला कांदा, कढीपत्ता घालून परतवावे. आता यामध्ये चवीनुसार ब्रोकोली आणि मीठ घालावे. तसेच काही वेळ परतवून घ्यावे. नंतर यामध्ये पाणी घालून झाकण ठेवावे आणि काही वेळ शिजू द्यावे. भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करा. तसेच थंड झाल्यानंतर स्मूथ करावी. आता गॅस सुरु करून परत शिजण्यास ठेवावे. आता यामध्ये दूध, चिली फ्लेक्स, मिरे पूड घालावी व मिक्स करावे. व काही सेकंड ढवळावे. तर चला तयार आहे आपले ब्रोकोली सूप, जे आरोग्यसाठी अतिशय फायदेशीर आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik