Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Healthy Juice For Immune System टोमॅटोचा रस

Healthy Juice For Immune System टोमॅटोचा रस
, शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (12:13 IST)
इम्युनिटी वाढविण्यासाठी अनेक उपाय आहे. (Remedies For Increase Immunity) परंतू काही वस्तू अशा आहेत ज्या अगदी सहज घरात उपलब्ध असतात ज्याचे सेवन करुन रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यापैकी एक आहे टोमॅटो
 
- टोमॅटोचे नियमित सेवन केल्यास हृदयरोगात आराम मिळतो.
 
- कोलेस्टेरॉल जास्त असल्यास टोमॅटोचा रस नियमित प्या.
 
- एलडीएल (बॅड कोलेस्ट्रॉल) पातळी कमी करण्यास टोमॅटो देखील उपयुक्त आहे.
 
- त्यात लाइकोपीन असते, जे शरीरात उपस्थित असलेल्या रॅडिकल्सला बेअसर करते, ज्यामुळे फ्री रॅडिकल्स आपल्या शरीराला हानी पोहोचवत नाहीत.
 
- नियमित सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्यापासून ते हृदयविकाराच्या झटक्यांपर्यंतच्या आरोग्यविषयक समस्येचा धोका कमी होतो.
 
ज्यूस बनवण्याची कृती-
सामुग्री-
- 1 कप पानी
- चिमूटभर मीठ
- 2 टोमॅटो
 
कृती-
- सर्वात आधी टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुवुन घ्या.
- त्यास लहान तुकडे करा आणि त्यांना ज्युसर जारमध्ये टाका.
- यात एक पाणी टाकून फिरवून घ्या.
- नंतर एका ग्लासमध्ये काढून सैंधव मीठ मिसळा.
- आपल्या आवडीप्रमाणे यात पुदिन्याची पाने देखील मिसळू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Benefits of Alum : फिटकरीचे 7 आश्चर्यकारक फायदे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे