Publish Date: Mon, 02 Jun 2025 (12:00 IST)
Updated Date: Mon, 02 Jun 2025 (12:24 IST)
साहित्य
आले-एक इंच
लवंगा- दोन
तुळशीची पाने-पाच
मध -एक टीस्पून
मिरे पूड -एक टीस्पून
पाणी-दोन ग्लास
हळदीचे मूळ-एक इंच
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी घ्या आणि ते उकळी येईपर्यंत गरम करा. आता पाणी उकळू लागले की त्यात तुळशीची पाने,मिरेपूड, लवंग, हळद आणि आल्याचे तुकडे घाला. आता पाणी मध्यम आचेवर अर्धा ग्लास पाणी शिल्लक राहेपर्यंत उकळवा. जेव्हा अर्धा ग्लास पाणी साहित्यासह शिल्लक राहते तेव्हा ते चाळणीच्या मदतीने एका भांड्यात गाळून घ्या. आता गाळलेल्या काढ्यात एक चमचा मध घाला आणि चमच्याने चांगले मिसळा. आता हे मिश्रण कपमध्ये सर्व्ह करा. तर चला तयार आहे आपला आरोग्यवर्धक काढा रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik