Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Kojagiri Pournima 2025 कोजागिरी पौर्णिमा विशेष मसाला दूध पाककृती

masala dudh
, सोमवार, 6 ऑक्टोबर 2025 (06:00 IST)
कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुधाचे विशेष महत्व असते. हे दूध रात्री चंद्रप्रकाशात पिण्याचा आनंद काही वेगळाच आहे. ही पाककृती सोपी असून कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला खास बनवते.   
 
साहित्य-
दूध-अर्धा लिटर  
साखर-तीन चमचे  
केशर गरम दुधात भिजवलेले 
वेलची पूड- १/४ चमचा
जायफळ पूड- चिमूटभर 
बदाम 
पिस्ता 
काजू 
चारोळी-एक चमचा  
गुलाबपाकळ्या 
 
कृती-
सर्वात आधी  एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करा. मंद आचेवर दूध उकळू द्या  दूध उकळायला लागल्यानंतर साखर घाला आणि मिश्रण नीट ढवळा. आता केशराच्या काड्या थोड्या गरम दुधात भिजवून ठेवा. दूध उकळल्यानंतर हे केशरी दूध मिश्रणात घाला. यामुळे दुधाला सुंदर रंग आणि सुगंध येईल. तसेच आता चारोळी घालावी. आता वेलची पूड आणि जायफळ पूड घाला. त्यानंतर बारीक कापलेले बदाम, पिस्ता आणि काजू मिसळा. व दोन मिनिटे मंद आचेवर उकळू द्या जेणेकरून मसाल्यांचा स्वाद दुधात मिसळेल. तयार मसाला दूध ग्लासमध्ये ओता. वरून गुलाबपाकळ्या घालून सजवा. तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हे दूध चंद्राच्या प्रकाशात काही वेळ ठेवण्याची प्रथा आहे. व  दूध थंड होऊन चव अधिक खुलते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्टीम घेण्याचे फायदे जाणून घ्या