साहित्य-
दही - एक कप
थंडगार पाणी - दोन कप
सेंधव मीठ
भाजलेले जिरे पूड- अर्धा चमचा
मिरे पूड - एक चिमूटभर
हिरवी मिरची - एक बारीक चिरलेली
कोथिंबीर- एक टेबलस्पून
पुदिन्याची पाने - बारीक चिरलेली
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात दही घ्या आणि फेटा. नंतर थंड पाणी घाला आणि ब्लेंडर किंवा व्हिस्कने चांगले मिसळा. आता सेंधव मीठ, जिरे पूड आणि मिरे पूड घाला आणि मिक्स करा.आता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीर घाला. तयार ताक एका ग्लासमध्ये ओता आणि वर भाजलेले जिरे पूड शिंपडा.फराळ करतांना थंडगार ताक नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik