हिवाळा विशेष रेसिपी : टोमॅटो सूप
, शनिवार, 7 डिसेंबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
टोमॅटो- 4
साखर -1/2 चमचा
लोणी-1 चमचा
काळे मिरे पूड -1/2 चमचा
ब्रेड क्यूब्स - 5
काळे मीठ- 1/2 चमचा
साय/ताजे क्रीम- 1 चमचा
हिरवी कोथिंबीर- 1 चमचा
चवीनुसार मीठ
कृती
टोमॅटो सूप बनवण्यासाठी सर्वात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यावे.आता या टोमॅटोचे मोठे तुकडे करावे. आता एका भांड्यात दोन कप पाणी घालून मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. आता त्यात चिरलेला टोमॅटो घालावा. टोमॅटो शिजवून घ्यावा. टोमॅटो चांगले शिजून मऊ झाल्यावर गॅस बंद करा. आता टोमॅटो बाहेर काढून सोलून घ्यावे. यानंतर टोमॅटोचे सर्व तुकडे बारीक करूनघ्यावे. यानंतर टोमॅटोचा लगदा एका मोठ्या चाळणीतून गाळून त्याच्या बिया वेगळ्या कराव्या. सूप घट्ट वाटल्यास आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करावे. यानंतर गॅसवर मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवावे. सूपला उकळी आली की त्यात लोणी, काळे मीठ, साखर, मिरे पूड आणि चवीनुसार मीठ घालावे.आता पाच मिनिटे शिजवा. यानंतर गॅस बंद करावा. तर चला तयार आहे आपले चविष्ट आणि हेल्दी टोमॅटो सूप, त्यात ब्रेड क्यूब्स आणि हिरवी कोथिंबीर घालून नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख