कारल्याचा स्वास्थवर्धक ड्रिंक
साहित्य : 2-3 हिरवेगार कारली, चवीनुसार मीठ, 1/2 लिंबाचा रस, 1 ग्लास पाणी, 2 टोमॅटो, 1 लहान काकडी. कृती : सर्वप्रथम कारले, टोमॅटो आणि काकडी या तिघांना स्वच्छ धुऊन काप करून मिक्सरमधून मधून फिरवून घ्यावे. स्वच्छ कपड्याने त्याला गाळून लिंबाचा रस घालून प्यायला पाहिजे. ह्या ड्रिंकमुळे रक्ताचे शुद्धीकरण होते व शरीरात रक्तसंचार व्यवस्थित होतो. मधुमेहींसाठी हे फारच उपयोगी आहेत.