Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरीच बनवा थंडगार लस्सी

घरीच बनवा थंडगार लस्सी
उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार लस्सीची मजा काही औरच. बाजारात विविध कंपन्यांच्या लस्सी उपलब्ध असतात पण, आपण घरीही त्याच चवीची लस्सी बनवू शकतो. ते कसे.. ते पहा...
 
साहित्य: 
 जाड थंड दही
 ताजी जाड मलई (फ्रेश क्रीम)
 मीठ (टीस्पून)
 साखर (चवीप्रमाणे)
 काजू (आवश्यकतेनुसार)
गुलकंद (आवश्यकतेनुसार)
 
कृती: 
१. दही,मलई,साखर आणि मीठ एकत्र करून ब्लेंडरवर छान घुसळून घ्या.
२. लस्सी ग्लास मध्ये फुटभर उंचीवरून ओता म्हणजे वरती मस्त जाड फेस तयार होईल.
३. त्यावर काजुचे तुकडे मस्तपैकी पेरा
४. आवश्यकतेनुसार गुलकंद घालून तासभर फ्रीज मध्ये ठेवा आणि थंडगार सर्व्ह करा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi