साहित्य : दीड कप काळी काफी, अर्धा कप चेरीचा ज्यूस, 2 चेरी सजावटीला, 2 चॉकलेटच्या वड्या, 2 चमचे किसलेले चॉकलेट, 4 मोठे चमचे क्रीम, 2 मोठे चमचे साखर.
कृती : एका उंच मगमध्ये चेरीचा रस घाला व त्यात चॉकलेटची एक वडी टाका. क्रीम व निम्मी साखर फेटून ठेवा. उरलेली साखर कॉफीमध्ये घालून कॉफी गरम करा व मगमध्ये ओता. त्यावर क्रीम घाला. चेरी व किसलेल्या चॉकलेटने सजवा.