साहित्य : दोन कप बारीक कापलेल्या भाज्या (मटर, गाजर, कोबी), एक बारीक कापलेला कांदा, दोन चमचे लोणी, दोन चमचा मैदा, चार कप दूध, मीठ, 1/2 चमचा पांढऱ्या मिरचीची पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : वर दिलेल्या सर्व भाज्या व लोणी एका भांड्यात टाकावे. त्यात एक कप पाणी घालून 5-10 मिनिट शिजवून घ्याव्या. मैदा व दूध
एकजीव करून ते मिश्रण शिजलेल्या भाज्यांत टाकावे. नंतर मीठ व पांढऱ्या मिरच्यांची पूड घालून घट्ट होईपर्यंत शिजवावे. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा