साहित्य : संत्र्याचा रस, मोसंबीचा रस, पायनॅपल रस प्रत्येकी 1 कप, साखर 1 कप, अर्धा कप पाणी, दोन मोठे चमचे जिलेटीन.
कृती : सर्व रस एकत्र करावेत. साखरही त्यात विरघळवून घ्यावी. अर्धा कप पाणी गरम करून त्यात जिलेटीन विरघळवून घ्यावे व गार झाल्यावर ते या रसाच्या मिश्रणात मिसळावे. मिश्रण मोठ्या भांड्यात फ्रीजरमध्ये ठेवावे. तासाभराने बाहेर काढून बीटरने घुसळून पुन्हा सेट करावे. सर्व्ह करताना प्रत्येक बाऊलमध्ये गोळा ठेवावा. वरून फळाच्या फोडींनी सजवावे.